मुंबई बातम्या

मुंबई: गर्दी टाळण्यासाठी मध्य-पश्चिम रेल्वेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय – Maharashtra Times

मुंबई: गर्दी टाळण्यासाठी मध्य-पश्चिम रेल्वेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मुंबई: करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशभर वाढत चालला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळं खबरदारी म्हणून राज्य सरकारनं अनेक निर्बंध उपाय सूचवले आहेत. गर्दी टाळण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. आता त्यादृष्टीनं मध्य आणि पश्चिम रेल्वेनंही मोठा आणि तितकाच महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबई: घाटकोपरमध्ये आढळला ‘करोना’ संशयित

राज्यातील सर्व स्थानिक निवडणुका तूर्त स्थगित

राज्य सरकारनं गर्दी टाळण्यासाठी प्रमुख प्रार्थनास्थळं दर्शनासाठी बंद करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार, अनेक मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता गर्दी रोखण्यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय या दोन्ही रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. मध्य रेल्वेवरील स्थानकांतील प्लॅटफॉर्म तिकीट दहा रुपयांवरून ५० रुपयांवर केलं आहे. मुंबई, पुणे, भुसावळ आणि सोलापूर विभागासाठी हा निर्णय लागू असणार आहे. तर पश्चिम रेल्वेनंही प्लॅटफॉर्म तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

डोळ्यातूनही होऊ शकतो करोनाचा संसर्ग?

‘त्या’ करोना रुग्णांवर रितेश देशमुख भडकला!

expert tips to save from coronavirus

Corona : तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी तज्ञांच्या टिप्स
Loading

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-indian-railway-central-railway-western-railway-has-increased-platform-ticket-mumbai/articleshow/74673652.cms