मुंबई बातम्या

मुंबई: घाटकोपरमध्ये करोना संशयित रुग्ण – Maharashtra Times

मुंबई: घाटकोपरमध्ये करोना संशयित रुग्ण
मुंबई: मुंबईत करोनाचा पहिला बळी गेला असतानाच, आता घाटकोपरमध्ये आणखी एक संशयित रुग्ण सापडल्यानं घबराट पसरली आहे. या रुग्णाला उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

देशात शंभरहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर बळींची संख्या तीनवर पोहोचली आहे. तर मुंबईत करोनाचा पहिला बळी गेला आहे. राज्य सरकारनं करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. अनेक ‘निर्बंध’ उपाय योजिले आहेत. असं असताना, राज्यातील करोना रुग्ण आणि संशयित रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाही. मुंबईतील घाटकोपरमध्ये करोनाचा आणखी एक संशयित रुग्ण सापडला आहे. तो अमेरिकेहून आला आहे. त्याला उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. परिसराची आरोग्य विभागामार्फत तपासणी केली जात आहे. त्यामुळं अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये, तसंच स्वतःच काळजी घ्यावी, असं आवाहन स्थानिक नगरसेविका राखी जाधव यांनी केलं आहे.

Live करोना: गायक अनुप जलोटा निरीक्षणाखाली

हुश्श! केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांना करोना नाही

expert tips to save from coronavirus

Corona : तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी तज्ञांच्या टिप्स
Loading

मुंबईच बंद केली तर… पंकजांनी सुचवला उपाय

प्रत्येक पोलीस ठाण्यात मास्क

मुंबई पोलिसांमार्फत प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये मास्कचं वाटप करण्यात आलं असून, पोलीस ठाण्यांमध्ये मदतीसाठी किंवा तक्रार देण्यासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला मास्क दिले जात आहे. तसंच त्याची तक्रार ऐकून घेतली जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता, योग्य ती काळजी घ्यावी व स्वच्छता ठेवावी; तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असं आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. मुंबई शहरातील ९४ पोलीस ठाण्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांना करोना विषाणू संसर्गाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात याचं काटेकोरपणे पालन होताना दिसून येत आहे.

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-suspected-corona-patient-found-in-ghatkopar-mumbai/articleshow/74673006.cms