मुंबई बातम्या

मोठी बातमी: कोरोनामुळे मुंबईत जमावबंदी लागू – Times Now Marathi

मोठी बातमी: कोरोनामुळे मुंबईत जमावबंदी लागू  &  | & फोटो सौजन्य:&nbspTimes Now

थोडं पण कामाचं

  • मुंबईत कलम १४४ लागू, जमावबंदीचा नियम मोडल्यास कारवाई
  • कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून कलम १४४ लागू
  • राज्यात कोरोनाचे तब्बल ३२ रुग्ण आढळले

मुंबई: राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. आता राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ही ३२ वर पोहचली आहे. त्यामुळे याचं गांभीर्य ओळखून मुंबईत कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आलं आहे. आज (रविवार) औरंगबादमध्ये एका ५९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ३२ वर पोहचली आहे. मुंबईत सुद्धा ५ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याने आता मुंबई पोलिसांनी ३१ मार्चपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. 

यासाठी मुंबई पोलिसांनी मुंबई दर्शन आणि इतर व्यावसायिक पर्यटन ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता पाचहून अधिक लोकांनी एकत्र जमू नये असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे यापुढे दर जमावबंदीचा कायदा मोडल्यास मुंबई पोलिसांकडून कारवाई देखील करण्यात येईल. यावेळी पोलिसांनी असंही आवाहन केलं आहे की, मोठे समारंभ, गर्दी आणि प्रवास टाळावा. जेणेकरुन कोरोनाची बाधा होण्याचं प्रमाण घटेल. 

दरम्यान, जगभरात लागण झालेल्या लोकांची संख्या ही १५०,००० च्या वर गेली आहे. आतापर्यंत १३७ देशांमध्ये ५५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात आतापर्यंत १०७ जणांना संसर्ग झाला आहे. 

बातमीची भावकी

आज १२ वाजेपर्यंत देशभरात परदेशी नागरिकांसह एकूण १०७ जणांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यात खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये, मॉल्स, सिनेमा हॉल बंद करण्यात आले आहेत.

ब्रिटनच्या एका नागरिकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दुबईला जाणारी एमिरेट्सच्या विमानातील सर्व २८९ प्रवाशांना केरळच्या कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आलं. या सर्वांची तपासणी करण्यात येण्यात असून या सगळ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mumbai-police-apply-section-144-in-mumbai-due-to-corona/284907