मुंबई बातम्या

#Coronavirus | मुंबई आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद – ABP Majha

मुंबई आयआयटीमध्ये असलेली 24 तास सुरू असलेली सेंट्रल लायब्ररीमधील रिडींग रूम देखील 29 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आयआयटीने प्रतिबंधात्मक खबरदारी म्हणून 29 मार्चपर्यंत सर्व विभागाचे वर्ग तसेच प्रयोगशाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे राज्य सरकारने राज्यातील शाळा महाविद्यालयाना सुट्टी जाहीर केल्यानंतर आता मुंबई आयआयटीकडून सर्व विद्यार्थ्यांना ई मेलद्वारे 29 मार्चपर्यंत वर्ग तसेच प्रयोगशाळा बंद ठेवणार असल्याचे सांगितले आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना 29 मार्चपर्यंत आपल्या घरी जायचे असल्यास त्यासंबंधी परवानगी देण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना घरी जाताना प्रवासासाठी काही अडचण असेल, शिवाय मुंबई आयआयटी शिकत असलेल्या बाहेरच्या देशातील विद्यार्थ्यां मुंबई आयआयटी हॉस्टेलसमध्ये सुट्टीच्या कार्यकाळात राहू शकतील अशा सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुढील सूचना ई मेल द्वारे विद्यार्थ्यांना कळविण्यात येणार आहे. तसेच हा परिस्थिती नियंत्रणात आल्यास त्यानुसार वर्ग, प्रयोगशाळा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या आपले थेसिस, प्रोजेक्ट आयआयटीमध्ये राहून आपलं काम पूर्ण करण्याचा सूचना दिल्या गेल्या आहेत. मात्र, हे काम करताना योग्य ती खबरदारी घेण्याचे सांगितले आहे. जे  कोणी विद्यार्थी कॉन्फरन्स, इंटर्नशिपसाठी किंवा अन्य कामासाठी कॅम्पस बाहेर गेले असतील त्यांनी आयायटीमध्ये न येता आपल्या घरी जाण्यास सांगितलं आहे. त्याच्यासोबत मागील 14 दिवसात जे विद्यार्थी त्यांच्यासोबत आलेले गेस्ट कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या देशातून आले असतील तर त्यांना मुंबई आयआयटीच्या रुग्णलायत जाऊन तातडीने तपासणी करावयाची आहे.

मुंबई आयआयटीमध्ये असलेली 24 तास सुरू असलेली सेंट्रल लायब्ररीमधील रिडींग रूम देखील 29 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. आयआयटी कॅम्पसमध्ये काम करणाऱ्या सेक्युरिटी गार्डस कर्मचारी वर्गाला सुद्धा खबरदारी म्हणून मास्क आणि हँड ग्लोव्हज घालण्यास सांगण्यात आलाय.

Source: https://marathi.abplive.com/news/mumbai/coronavirus-effect-iit-bombay-suspened-classroom-and-lab-till-29th-march-750523