मुंबई बातम्या

करोना: मुंबई हायकोर्टात गरज असेल तरच यावे-बीबीए – Maharashtra Times

करोना: मुंबई हायकोर्टात गरज असेल तरच यावे-बीबीए
मुंबई: राज्यात अकरा जणांना करोनाची लागण झाली आहे. करोनाचा राज्यात फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयातही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यकता असेल तरच पक्षकारांनी न्यायालयात यावे, अशा सूचना द्याव्यात, अशी विनंती बॉम्बे बार असोसिएशननं मुंबई उच्च न्यायालय प्रशासनाला केली आहे.

expert tips to save from coronavirus

Corona : तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी तज्ञांच्या टिप्स
Loading

करोना: …म्हणून पुण्यात पुढचे ३ दिवस धोक्याचे

राज्यात करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर सर्व स्तरांवर खबरदारी घेतली जात आहे. बॉम्बे बार असोसिएशननंही सदस्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसंच मुंबई उच्च न्यायालय प्रशासनालाही विनंती केली आहे. सुरक्षेसाठी तैनात पोलिसांना ‘टेम्परेचर गन’ पुरवण्यात यावेत, स्वतः खटला लढणाऱ्या पक्षकारांचे खटले गैरहजेरीमुळं निकाली निघणार नाहीत, असा आदेश काढावा, अशी विनंती बीबीएनं प्रशासनाला केली आहे. आवश्यकता असेल तरच पक्षकारांनी न्यायालयात यावे अशी सूचना जारी करावी अशी विनंतीही बीबीएनं प्रशासनाला केली.

‘त्या’ करोनाग्रस्तांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत!

करोनाच्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

बीबीएच्या कार्यालयात पक्षकारांना आणू नये, सुनावणीला आवश्यक असेल तरच पक्षकारांना न्यायालयात येण्यास सांगावे. कोणालाही भेटल्यानंतर हस्तांदोलन करू नये. सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहनही बीबीएनं आपल्या सदस्यांना केलं आहे.

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-corona-bba-appeals-only-if-needed-in-mumbai-high-court/articleshow/74595648.cms