तीन महिन्यांपूर्वी वाईफ स्वॅपिंगच्या प्रकरणात अटक झालेल्या मुंबईतील एका बिझनेसमनचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आरोपीच्या पत्नीवर त्याच्या तीन मित्रांनीही बलात्कार केला. हे सर्व आरोपीच्या संमतीनेच घडले. नवऱ्याने त्याच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पत्नीचा वापर केला. दुसरा कुठलाही सामान्य नवरा असे वर्तन करणार नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
नवऱ्याने पत्नीला पॉर्न व्हिडीओ पाहायला लावले. त्यानंतर अन्य दोन आरोपीसोबत शरीरसंबंध ठेवायला भाग पाडले असे कोर्टाने पत्नीच्या आरोपांचा हवाला देताने म्हटले आहे. आपल्या वकिलांमार्फत महिलेने आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. २०१७ साली महिलेबरोबर पहिल्यांदा असा प्रकार घडला. त्यानंतर दोन वर्षांनी तिने तक्रार नोंदवली. मानसिक आघात झाल्यामुळे तिने तक्रार नोंदवायला इतका वेळ घेतला असे महिलेच्या वकिलाकडून सांगण्यात आले.
पत्नी माझ्यापासून समाधानी नव्हती, म्हणून तिने तिच्या संमतीने दुसऱ्याची निवड केली हा आरोपीचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. शरीरसंबंधांचा विचार करता महिलांच्या तुलनेत पुरुषांचा स्वभाव जास्त आक्रमक असतो. “नवऱ्याने केलेल्या आरोपानुसार पत्नी जर तिच्या पतीपासून समाधानी नसती, तर तिने स्वत: गुप्तपणे संतुष्टी मिळवण्याचा मार्ग निवडला असता. नवऱ्याला तिच्यासाठी दुसरा पुरुष शोधायला सांगणार नाही” असे न्यायालयाने म्हटले आहे.
नवऱ्याने पत्नीच्या शरीरसंबंधांचा व्हिडीओ सुद्धा बनवला. “यातून कल्पनेतील वासना क्षमवण्याचा नवऱ्याचा हेतू दिसतो किंवा पत्नीला दबावाखाली ठेवण्याची रणनिती आहे” असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने या प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. डिसेंबर महिन्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
First Published on March 11, 2020 2:51 pm
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-no-bail-for-wife-swapper-businessman-dmp-82-2104695/