मुंबई बातम्या

भाजप खासदार स्वामींना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळणार – Maharashtra Times

भाजप खासदार स्वामींना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळणार
मुंबई: जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जातीचा दाखला अवैध ठरवून रद्द केल्याने खासदारकी धोक्यात आलेले भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजप खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या जातीच्या दाखल्याच्या प्रश्नावर पुन्हा सुनावणी घेऊन विशिष्ट कालमर्यादेत निर्णय देण्याचे निर्देश आम्ही जात प्रमाणपत्र समितीला देऊ, असे संकेत मुंबई हायकोर्टानं आज सुनावणीअंती दिले आहेत. यासंदर्भात सर्व पक्षकारांच्या वकिलांना त्यांचे वेळापत्रक उद्या, गुरुवारी देण्यात कोर्टानं सांगितलं आहे.

…म्हणून भाजप खासदार जयसिद्धेश्वर यांच्या अडचणींत भर

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड काळजीत आहेत’

स्वामी यांनी गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपतर्फे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. स्वामी यांनी बेडाजंगम या अनुसूचित जातीचा दाखला सादर करून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा जातीचा दाखला बनावट असल्याची तक्रार मिलिंद मुळे यांनी नोंदवल्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्याची छाननी केली. अखेरीस चौकशी व सुनावणीअंती समितीने २४ फेब्रुवारी रोजी स्वामींचा जातीचा दाखला अवैध ठरवत रद्द केला. यामुळे खासदारकी धोक्यात आल्याने स्वामींनी अॅड. संतोष न्हावकर यांच्यामार्फत तातडीने रिट याचिका करून उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/relief-may-be-for-bjp-mp-jaisidhesvar-swami-by-mumbai-high-court/articleshow/74579009.cms