नवी मुंबई : करोनाबाधित दोन रुग्ण मुंबई-पुणे प्रवासादरम्यान नवी मुंबईतून गेल्याने नवी मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. प्रवासादरम्यान हे रुग्ण कोठे थांबले होते का? कोणाच्या संपर्कात आले का? याचा शोध सुरू आहे.
करोना विषाणूचे पुण्यात दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यांनी मुंबई ते पुणे असा ओला टॅक्सीने प्रवास केला असल्याचे समोर आले असून ते नवी मुंबईतून पुढे गेले होते. मात्र प्रवासादरम्यान ते कोठे थांबले होते का? कोणाच्या संपर्कात आले होते का? याचाही शोध सुरू आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने करोना रुग्णासाठी एक कक्ष आरक्षित ठेवला असून ८ खाटांचा त्यात समावेश आहे. ‘एन ९५’ मास्कचा साठा तयार ठेवला असून अडीच हजार मास्क उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय ट्रिपल लेअर मास्क जे कर्मचाऱ्यांसाठी आहेत ते ४० हजार उपलब्ध आहेत. याशिवाय जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे.
[embedded content]
मनपा आरोग्य विभाग तयार आहे. पुण्यात आढळून आलेले करोनाबाधित रुग्ण मुंबई-पुणे प्रवासादरम्यान नवी मुंबईत थांबलेले नव्हते, अशी माहिती समन्वयातून पुढे आली आहे. नवी मुंबईकरांनी न घाबरता योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.
First Published on March 11, 2020 2:02 am
Source: https://www.loksatta.com/navimumbai-news/pune-coronavirus-patients-travel-through-navi-mumbai-zws-70-2104268/