मुंबई बातम्या

…म्हणून देखील मुंबई पोलिस आहेत एक नंबर ! बातमी वाचा, प्रतिक्रिया द्या… – Sakal

मुंबई : लोकांचं रक्षण करण्यासाठी पोलिस सतत तत्पर असतात. ऊन, वारा, पाऊस या सगळ्यांची पर्वा न करता पोलिस सतत ऑन ड्युटी असतात आणि आपलं कर्तव्य पार पाडत असतात. फक्त मानवच नाही तर प्राण्यांचंही रक्षण पोलीस करत असतात. अशीच काहीशी घटना आज मुंबईत घडली. 

मुंबई पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका श्वानाचा जीव वाचवल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या नरिमन पॉईंट इथे ही घटना घडली आहे. हा श्वान तिथे फिरत असताना त्याचा पाय दगडात अडकला होता. त्याला बाहेर निघता येत नव्हतं. मात्र पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या श्वानाचे प्राण वाचवले आहे. 

हेही वाचा: “नवी मुंबईकरांनो गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार रहा”…

नक्की काय घडलं:

नरीमन पॉईंट इथल्या क्वीन्स नेकलेसजवळील हॉटेल मरीना प्लाजा समोरच्या लाटा रोधक दगडांमधून एका भटक्या श्वानाचा ओरडण्याचा आवाज येत होता. इथे येणाऱ्या अनेक पर्यटकांना श्वानाचा आवाज येत होता. मात्र कोणीही त्या श्वानाला बाहेर काढण्यासाठी पुढे जात नव्हतं. त्याचवेळी आपल्या पाळीव श्वानाला फेरफटका मारण्यासाठी घेऊन आलेल्या एका तरुणाचं लक्ष त्या श्वानाकडे गेलं. त्यानं आपल्या पाळीव श्वानाच्या गळ्यातला पट्टा काढला आणि त्या श्वानाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागला. मात्र कोणीही त्या तरुणाच्या मदतीला आलं नाही. मात्र तिथून जाणाऱ्या ४ खाकी वर्दीतील पोलिसांना या तरुणाची धडपड दिसली आणि ते तात्काळ त्या तरुणाची मदत करण्यासाठी पुढे आले. एक पोलीस जीवाची पर्वा न करता थेट खाली लाट रोधक खडकांवर उतरला आणि त्या श्वानाला बाहेर काढलं. 

हेही वाचा: डेटॉलने हात धुतल्याने कोरोनाचे विषाणू मरतात?

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुंबई पोलिस  नेहमी कोणाचंही रक्षण करण्यासाठी तत्पर असतात. मुंबई पोलिसांच्या या शौर्याला सलाम. 

Mumbai police saved street dogs life at Nariman point read full story

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-police-saved-street-dogs-life-nariman-point-read-full-story-269175