हाय सिक्युरिटी नंबरप्लेट चोरणारा जेरबंद
शीव उड्डाणपूल आजपासून बंद
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ओझर्डे गावाजवळ आज सकाळी सहा वाजता भीषण अपघात झाला. दूध वाहतूक करणाऱ्या पीक अप टेम्पोनं भरधाव कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. यात टेम्पोचा चालक आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक जण जखमी झाला. चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळतात, पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी एक्स्प्रेस वेवरून अपघातग्रस्त वाहन हटवले. त्यामुळं वाहतूक कोंडी झाली नाही. पुण्याकडील वाहतूक सुरळीत सुरू आहे. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/two-injured-an-accident-on-mumbai-pune-express-highway/articleshow/74503899.cms