मुंबई बातम्या

विमानात मृत्यू, पार्थिव 40 दिवसांनी मायदेशी | Mumbai Woman Dead body – TV9 Marathi

मुंबई : चीनवरुन ‘एअर चायना’च्या मेलबर्न-बीजिंग-मुंबई (Mumbai Woman Dead Body At China) विमानात प्रवासादरम्यान मृत्यू झालेल्या मुंबईकर महिलेचा मृतदेह अखेर 40 दिवसांनी मायदेशी परतला आहे. कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे या महिलेचा मृतदेह आतापर्यंत चीनच्या शवागरात होता. आता तब्बल 40 दिवसांनंतर या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आले.

कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातलेला (Mumbai Woman Dead Body At China) असतानाच मुंबईकर कुटुंबाला याचा अप्रत्यक्ष फटका बसला. विमानात मृत्युमुखी पडलेल्या आईचा मृतदेह चीनहून मायदेशी आणण्यासाठी मेहरा कुटुंब गेल्या 40 दिवसांपासून प्रतीक्षा करत होते.

हेही वाचा : कोरोनापासून संरक्षणासाठी मास्कची गरज नाही, स्वच्छ रुमाल वापरा : आरोग्यमंत्री

मुंबईतील वांद्र्यामध्ये राहणारे डॉ. पुनित मेहरा हे गेल्या पाच वर्षांपासून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नला राहात होते. यादरम्यान त्यांच्या पत्नीला दिवस गेले. त्यामुळे या आनंदात रिटा या मेलबर्नला पुनित आणि त्यांच्या पत्नीला घ्यायला पोहोचल्या.

गेल्या 24 जानेवारी 2020 रोजी मेहरा कुटुंब ‘एअर चायना’च्या विमानाने बीजिंगमार्गे मुंबईला निघाले. परतीच्या प्रवासात रिटा विमानात बाथरुममध्ये गेल्या. मात्र, बराच वेळ उलटूनही आई परत न आल्यामुळे पुनित यांना शंका आली. त्यांनी पाहणी केली असता रिटा विमानातील बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत आढळल्या.

हेही वाचा : कोरोनाचा धसका, मास्क घेण्यासाठी धावाधाव, रत्नागिरीत एका मास्कची किंमत…

रिटा यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी विमानाचं चीनच्या झेंगझोऊ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. मात्र रिटा मेहरा यांची प्राणज्योत मालवली. 7 फेब्रुवारी रोजी डॉ. पुनित भारतात परत आले. मात्र, त्यांच्या आईचं पार्थिव झेंगझोऊमधील शवगृहात ठेवण्यात आलं.

रिटा मेहरा यांचं पार्थिव भारतात आणण्यासाठी मेहरा कुटुंबाने भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याशी संपर्क केला आणि भारत सरकार, परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावासच्या मदतीने 40 दिवसांनंतर मुंबईत आणण्यात आलं.

हेही वाचा : महाराष्ट्रात एकही कोरोनाग्रस्त नाही, अफवांना बळी पडू नका, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

कोरोना विषाणूमुळे चीनमधील परिस्थिती गंभीर असल्याने पार्थिव आणण्यात विलंब होत होता. त्यानंतर आज 40 दिवसांनी रिटी यांचं पार्थिव बिजिंग विमानतळावरील कार्गो एजंटच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर ते दुपारी शव बिजिंग ते अबू धाबी आणि नंतर मुंबईकडे रवाना करण्यात आले. रिटा मेहरा यांचं पार्थिव दुपारी 2.45 ला मुंबई विमिनतळावर पोहोचलं. त्यानंतर रिटा मेहरा यांच्या पार्थिवावर सांताक्रूझच्या हिंदू स्मशान भूमीत अंतिम संस्कार (Mumbai Woman Dead Body At China) करण्यात आले.

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/mumbai-woman-dead-body-returned-homeland-after-40-days-which-is-stucked-at-china-190102.html