मुंबई बातम्या

‘…तर भाजपने दिल्लीप्रमाणे मुंबई पेटवली असती’ – Maharashtra Times

‘…तर भाजपने दिल्लीप्रमाणे मुंबई पेटवली असती’
मुंबई: ‘भाजपची मुंबईत सत्ता असती तर दिल्लीप्रमाणे यांनी मुंबईसुद्धा पेटवली असती’, असे नमूद करत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला आहे.

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार आणि भाजपच जबाबदार आहे. या दंगलीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून करण्यात आली आहे. दिल्ली हिंसाचाराविरोधात काँग्रेसकडून निदर्शनांद्वारे निषेधही नोंदवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेकडे बोट दाखवत सचिन सावंत यांनी भाजपला लक्ष्य केले.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आहे म्हणून आज मुंबई व महाराष्ट्र शांत आहे. राज्यात भाजपची सत्ता असती तर दिल्लीप्रमाणेच मुंबईसुद्धा पेटवली गेली असती, असा थेट आरोप सावंत यांनी भाजपवर केला. देशात दंगे भडकवून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा भाजपाचा डाव आहे. तो मोडून काढला पाहिजे, असे आवाहनही सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले.

‘… तर मुस्लिम आरक्षणाला विरोध जाहीर करा’

राष्ट्रपतींना भेटले होते शिष्टमंडळ

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन दिल्ली हिंसाचाराचा मुद्दा उचलला होता. काँग्रेस समितीच्या बैठतीनंतर सोनियांनी अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. दिल्लीत झालेल्या हिंसाचारासाठी अमित शहा जबाबदार असल्याचं सांगत त्यांनी शहांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेससह विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरुद्ध आंदोलनही केले. दिल्ली हिंसाचाराचा निषेध म्हणून काँग्रेसने गांधींच्या पुतळ्याजवळ आपला निषेध व्यक्त केला. या आंदोलनात काँग्रेसचे नेते राहुल गांधी हेदेखील सहभागी झाले होते.

CAA विरोधी रॅली; आंबेडकरांची मायावतींना साद

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/if-bjp-had-power-in-mumbai-then-like-delhi-they-would-have-burned-mumbai-says-congress-leader-sachin-sawant/articleshow/74464889.cms