मुंबई बातम्या

मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय ! जमावबंदी लागू करण्याचे दिले आदेश… – Sakal

मुंबई: संपूर्ण देशभरात CAA आणि NRC च्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर झालेला  हिंसाचार लक्षात घेऊन आता मुंबई पोलिसांनी या संदर्भात पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मुंबईत येत्या ९ मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.  

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशाच्या राजधानीत मोठ्या प्रमाणावर आंदोलनं सुरू आहेत. यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचारही  झाला आहे. आतापर्यंत तब्बल ४२ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतही या कायद्याविरुद्ध मोर्चे निघालेत. दिल्लीतल्या हिंसाचाराचे पडसाद मुंबईसारख्या मोठ्या शहरावर उमटू नयेत म्हणून मुंबई पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. एका ठिकाणी ५ पेक्षा अधिक लोकांनी उभ राहू नये, घोळका करून उभं राहू नये, कोणत्याही प्रकारचा मोर्चा काढू नये अशा प्रकारचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आले आहेत. 

मोठी बातमी –  समोरच्याला समजू न देता असे वाचा #WhatsApp वरचे मेसेज…

दरम्यान विवाह समारंभ, अंत्यविधी सहकारी संस्थांच्या बैठक, वैधानिक बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, तसंच अन्य नियमित कामकाजाच्या कार्यक्रमांना यातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपटगृह, नाट्यगृह तसंच सार्वजनिक मनोरंजनाची ठिकाणं, न्यायालयं, शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय तसंच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकानं तसंच व्यापार, व्यवसाय या कारणांमुळे होणाऱ्या जमावाला या जमावबंदीचे नियम लागू होणार नाहीत. मात्र  मोर्चा काढणं, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती जमणं, जमाव करून फटाके फोडणं , बँड यावर बंदी घालण्यात आली आहे.  

मोठी बातमी – मुस्लिम, मराठा आरक्षणासंदर्भात अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य, म्हणालेत…

९ मार्च पर्यंत बृहन्मुंबई हद्दीत हे आदेश लागू राहणार आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील अधिकारानुसार पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या जमावबंदीचे नियम पाळण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय.    

mumbai police imposes section 144 in mumbai till 9th march

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-police-imposes-section-144-mumbai-till-9th-march-266439