मुंबई बातम्या

बॉम्बे सॅपर्सच्या पुण्यातील मुख्यालयात साकारले रॉयल एनफिल्‍डचे स्मारक – Sakal

पुणे : बॉम्‍बे सॅपर्सच्‍या पुण्‍यातील त्‍यांच्‍या मुख्‍यालयांमधील द्विवार्षिक उत्‍सवाचा भाग म्‍हणून एका अनोख्‍या मोटरसायकल स्‍मारक साकारण्यात आले. हे स्‍मारक बॉम्‍बे सॅपर्सच्‍या ८ राइड्सनी २७ दिवसांमध्‍ये कारगिलमधील द्रासपासून पुण्‍यापर्यंत रॉयल एनफिल्‍ड मोटरसायकल्‍सवर केलेल्‍या प्रवासाचे प्रतीक आहे. या राइडदरम्‍यान त्‍यांनी जवळपास ४००० किमीहून अधिक अंतर प्रवास केला. ही राइड बॉम्‍बे सॅपर्सच्‍या २०० वर्षे पूर्ततेला साजरे करण्‍यासाठी हाती घेण्‍यात आलेल्‍या अनेक उपक्रमांचा भाग होती. या द्विवार्षिक उत्‍सवाला चीफ ऑफ आर्मी स्‍टाफ (सीओएएस) जनरल मनोज मुकुंद नरवणे आणि रॉयल एनफिल्‍डचे राष्‍ट्रीय विक्रीप्रमुख पंकज शर्मा उपस्थित होते.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

असाधारण समूहाप्रमाणेच याचे काळाच्‍या परीक्षणाच्‍या प्रतिकाप्रमाणे डिझाइन करण्‍यात आले होते. या स्‍मारकामध्‍ये २०० वर्षांच्‍या यशस्‍वी पूर्ततेला दाखवण्‍यासाठी वक्राकार संगमरवरी, कर्तव्‍याच्‍या वेळी सर्वोत्तम रचना निर्माण करणा-या बॉम्‍बे सॅपर्सच्‍या सन्‍मानासाठी लोखंडी ब्रिज, समूहाचे प्रतिक म्‍हणून स्‍टेनलेस स्‍टील शिखर, शक्तिशाली काँक्रिट पार्श्‍वभूमी, द्रास ते पुण्‍यापर्यंत प्रवास दाखवणारा सुरेखरित्‍या तयार केलेला भारताचा नकाशा आणि या असाधारण मोहिमेसाठी वापरण्‍यात आलेली शक्तिशाली रॉयल एनफिल्‍ड हिमालयन मोटरसायकल यांचा समावेश होता. 

या स्‍मारकामध्‍ये मोहिमेमधील यशस्‍वी क्षणांना देखील टाइल्‍स रचित छतामध्‍ये दाखवण्‍यात आले आहे. या स्‍मारकामधून पुण्‍यातील खडकी येथील त्‍यांच्‍या मुख्‍यालयाचे प्रसन्‍न वातावरण दिसून येते. 

अधिकृतरित्‍या बॉम्‍बे इंजीनिअरिंग ग्रुप म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या बॉम्‍बे सॅपर्सला अनेक सन्‍मानांसह गौरविण्‍यात आले आहे, जसे व्हिक्‍टोरिया क्रॉस, परमवीर चक्र, अशोक चक्र आणि फ्रेंच लेजन ऑफ ऑनर. रॉयल एनफिल्‍ड सर्वोत्तम, विश्‍वसनीय व अष्‍टपैलू मोटरसायकल्‍स निर्माण करण्‍यासाठी ओळखली जाते. रॉयल एनफिल्‍डचा भारतीय सशस्‍त्र सेनेसोबत ६५ वर्षांचा अभिमानास्‍पद वारसा आहे. 

Source: https://www.esakal.com/sci-tech/monument-royal-enfield-bombay-sappers-office-258978