मुंबई बातम्या

कार 1940 ते 2020 : बॉम्बे सैपर्सची शान – Digital Prabhat

पुणे : पुण्यातील बॉम्बे सैपर्स या भारतीय लष्करातील विभागाला दोनशे वर्षे पूर्ण झाली. 200 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी बॉम्बे सैपर्स विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचनिमित्ताने आज पुण्यातील बॉम्बे सैपर्सने हेरिटेज वॉक चे आयोजन केले होते. यादरम्यान तेथील सर्वांचे लक्ष वेधून घेणारी इतिहासाची साक्षीदार म्हणजे डॉज कारची माहिती देण्यात आली. बॉम्बे सैपर्सची स्थापन ब्रिटीश लष्कराने केली या विभागाची 1820 पासून ची कागदपत्रे उपलब्ध असल्या कारणाने 2020 हे वर्ष दोनशेवाव्या म्हणून साजरे केले जात आहे.

Related Posts

[embedded content]

तेथील ‘डॉज’ या कारला पूर्वी एकच लाईट आणि आणि एकच वायपर होता. त्याच्या रिनोवेशन साठी डॉज कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी हे बदल कोठे करणार असे विचारले त्यावेळी आम्ही बॉम्बे सैपर्स आहोत येथेच सर्व बदल करू असे कळवले. या कारने 2 लाख 3 हजार किलोमीटर चा प्रवास केला आहे. यापूर्वी 1970 मध्ये तिचे रिनोवेशन करण्यात आले होते. 1944 मध्ये या कारची किंमत 5908 रुपये इतकी होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात याच कंपनीचे ट्रक वापरण्यात आले होते.

Source: https://www.dainikprabhat.com/bombay-sappers-vintage-dodge-car/